लोकनेता न्यूज नेटवर्क
माहूर (राजकिरण देशमुख) :- सततच्या नापिकी व कर्जाबारीपणाला कंटाळल्याने विषारी औषध प्राशन करून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना दिनांक १३ मार्च रोजी मौजे ईवळेश्वर ता. माहूर येथे घडलेल्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव सुंदरसिंग ठाकरा राठोड वय- ४० असे आहे. त्यांचेकडे बँकेचे थकबाकी कर्ज होते व गेल्या चार वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत नापिकी होत असल्याने कर्ज कसे फेडावे या चिंतेत ते नेहमी राहत असे त्यामुळे दि.१३ मार्च २०२६ रोजी विषारी औषध प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली. सदर प्रकरणी माहूर पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुंदरसिंग ठाकरा राठोड यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment