शासकीय पेन्शनधारक असतानाही लाटला घरकुल बांधकामासाठी मिळणाऱ्या शासकीय जागेचा लाभ;

सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील प्रकार

लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा: शासनाची दिशाभूल करून आणि नियमांना बगल देऊन शासकीय पेन्शनधारक व्यक्तीने घरकुल बांधकामासाठी 500 चौ.फू शासकीय जागेचा लाभ घेतल्याचा खळबळजनक प्रकार सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथे समोर आला आहे. याप्रकरणी 'भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने गट विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.पळसखेड चक्का येथील रहिवासी वंकेश्वर रामजी मोरे हे आरोग्य विभागाचे निवृत्त कर्मचारी असून ते शासनाची पेन्शन घेत आहेत. नियमानुसार, शासकीय पेन्शनधारक व्यक्ती घरकुल योजनेसाठी पात्र नसतानाही, त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे घरकुल बांधकामा साठी शासकीय जागा क्रमांक २५१ अंतर्गत शासकीय जागेचा लाभ घेतल्याचा आरोप पत्रात करण्या ,त आला आहे.या तक्रारीत केवळ लाभार्थ्यावरच नाही, तर ह्याच गावातील अनेक घरकुल लाभार्थ्यांनी शासनाने 500 चौ.फूट शासकीय जागेचे लाभार्थ्यांना वाटप केली असताना मात्र घरकुल दुसऱ्याच ठिकाणी बांधून सर्वच मिळणारे हप्ते देखील काढण्यात आले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.तत्कालीन घरकुल जियो ट्रॅकिंगकरणारे कर्मचारी, ग्रामसेवक आणि संबंधित इंजिनिअरवरही गंभीर ठपका ठेवण्यात आला असून आहे.गरजू आणि पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित असताना,पेन्शनधारकाला तातडीने परवानगी कशी मिळाली, असा सवाल उपस्थित केला आहे. घरकुलाचे हप्ते काढण्यापूर्वी जिओ टॅगिंग (Geo-tagging) करणे बंधनकारक असते. मात्र, प्रत्यक्ष पडताळणी न करताच हप्ते काढण्यात आल्याने संबंधित इंजिनिअरची भूमिकाही संशयास्पद असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

       भिमशक्ती सामाजिक संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष अर्जुन काकडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी ग्रामपंचायत सचिव आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, शासनाची फसवणूक करून घेतलेले घरकुलाचे हप्ते परत घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. योग्य ती कारवाई न झाल्यास पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे.बालूभाऊ म्हस्के, प्रमोद म्हस्के,किशोर पाडमुख, ओमप्रकाश राठोड,राजू अवसरमोल, यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थिती मध्ये गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

________________________

0/Post a Comment/Comments