यूवर नॉलेज टु इज नॉट नोन टू यू , इज ॲन अनफोर्च्युनेट फॅक्ट फॉर यू -ॲड. विजयकुमार कस्तुरे.....

लोकनेता न्युज नेटवर्क

परभणी- नुकतेच महाराष्ट्रामध्ये आपल्या साहित्यिक व सामाजिक उपक्रमांसाठी सर्वश्रृत असलेल्या अक्षर मानव संघटन  तर्फे आणि जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद जिल्हा शाखा परभणीच्या सौजन्याने परभणी येथील राजे संभाजी गुरूकुल च्या निसर्ग रमणीय परीसरातील भव्य सभागृहात आणि गुरूकुल च्या जवळ जवळ बाराशे विद्यार्थी-विद्यार्थिनी तथा बहुसंख्य शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य तसेच राज्यभरातून निमंत्रित कवि, साहित्यिक, रसिक तथा नागरिकांच्या उपस्थितीसह सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. सतीष तराळ यांच्या हस्ते उदघाटन होवून दि. १९-०४-२०२६ रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय काव्य महोत्सव - २०२६ च्या अध्यक्षपदावरून विद्यार्थ्यांशी प्रबोधनात्मक हितगूज करताना ज्येष्ठ साहित्यिक कवि तथा कलावंत ॲड. विजयकुमार कस्तुरे यांनी वरील विधान करून पुढे त्याचा खुलासाही केला.

      आज तुम्ही ज्या पुस्तकातून अभ्यास करीत आहात तशी पुस्तके तुमच्या हातून लिहिल्या जावून पुढील पिढ्यांच्या हाती अध्ययनासाठी असावीत ही प्रत्येकाने मनाशी खुणगाठ बांधायला हवी, पण त्यासाठी तुम्हाला तुमचे अंत:चक्षु उघडावे लागतील हे लक्षात घेणे गरजेचे आहे, हे निक्षून सांगितले. तुम्हाला खूप काही ज्ञात आहे पण आपल्याला ते माहीत आहे, हेच तुम्हाला माहीत नाही.....

ही खरी शोकांतिका आहे.

   हे सांगून इंग्रजीचे a अक्षर ज्याच्या स्पेलींगमधे येणार नाही असे जास्तीत जास्त किती शब्द तुमच्या पैकी कुणी सांगू शकेल का.....?

    असा प्रबोधनात्मक प्रश्न विचारून त्यासाठी आठ दिवसांत तुम्ही किती शब्द लिहू शकता याचा अंदाज करून पहावा, असे सांगून, केवळ काही सेकंदात मी तुम्हाला तसे हजार शब्द माहीत आहेत आणि तुम्ही ते सांगू सुध्दा शकता हे तुम्हाला सांगू शकतो, पण आपल्याला ते माहीत आहेत हेच तुम्हाला समजलेले नाही.....

ही खरी अडचण आहे.....!

     हे स्पष्ट करून अगदी काही सेकंदातच सर्वांना त्याप्रकारचे एक हजार शब्द कोणते हे सायना संगीत प्रत्यक्ष दाखवून दिले. एवढेच नाही तर आपल्या संवैधानिक, सामाजिक तथा वैचारीक कवितांच्या काव्य गायनाने सारे वातावरण भारावून टाकले.

    छत्रपतीं शिवाजी राजेंच्या प्रतिमा पूजनाने उदघाटन होऊन अक्षर मानव चे पदाधिकारी ॲड. शंकर कदम यांच्या प्रास्ताविकाने संमेलनाची सुरुवात झाली.

      या प्रसंगी ज्येष्ठ कथाकार डॉ. बबनराव महामुने यांच्या मोगलाईच्या  प्राकृतिक भाषेतील मनोरंजक कथेने सर्वांना हसवीले तर कवितेने गंभीर ही केले. डॉ. तराळ सरांनी उदघाटकीय भाषणातून यमूना मिळाली गंगेला या कथेसह छ. संभाजी महाराजांच्या पत्नी यांच्या विषयीची माहीती देवून महात्मा बसवेश्वरांच्या जयंती निमित्त त्यांचे मानवीय कार्य तसेच म. फुल्यांचे द्विशतक वर्ष असल्याचे विषद करून त्यांना आधुनिक वाङमयीन साहित्याचे जनक म्हणून असलेली ओळख निवेदन करीत जगात सध्या मार्क्सवाद, गांधीवाद व आंबेडकरवाद असे तीनच वाद असून त्यांच्या तुलनात्मक प्रभावाची माहिती सांगितली.

   तर कविसंमेलनाची सुरूवात करतांना डॉ. विजयकुमार कस्तुरे यांनी समोर उपस्थित रसिक श्रोत्यांशिवाय कोणत्याही संमेलनाची यशस्विता ठरू शकत नाही त्यामुळे तेच खरे प्रमुख अतिथी आहेत हे बोलून त्या सर्वांचे स्वागत करणे आपले कर्तव्य आहे असे म्हणून स्वरचित स्वागत गीताने सर्वांचे हार्दिक स्वागत करून टाळ्या मिळविल्या. तर त्यांच्या -

एका कवितेमुळे, एका कवितेमुळे.....

    या कवितेने काव्य संमेलनाची सुरूवात होतानाच सर्व विद्यार्थ्यांनी हर्षोल्हासाने टाळ्यांचा ठेका धरीत गावून साथ देवून सारे सभागृह दणाणून सोडले.

    तसेच त्यांच्या अंतर्राष्ट्रीय किर्ती मिळवणाऱ्या - त्या तरूच्या सावलीला, चल सखे बोलू जरा.....या कवितेची ही आग्रही मागणी करण्यात आल्यामुळे ती सुध्दा त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात गावून सादर केली.

    त्यानंतर कवयित्री सुनंदा भगत, भाग्यश्री आसोडे, दिनकर गरूड, अनुराधा, गोरखनाथ घाटपांडे, व्यंकनबाई चेन्नलवाढ, डॉ. उषा कदम, गायत्री खिस्ते, स्नेहा सातपुते, वैभवी सातपुते, कमलाकर दुबे, पल्लवी हिवाळे, ज्योती देशमुख, अनिता भोसले, तारा आघाडे, ज्ञानेश्वर नखाते, कविता वडगावकर, मुरलीधर रणखांब, सचिन मुळे, दुर्गा नंद वाळवंटे, सुनिता धर्माधिकारी, दिव्या गोविंद मुळगीर, डॉ. बबनराव महामुने, सलोनी जयस्वाल, शिल्पा साळवे, अनंता पठारे, वानखेडे मॅडम, ज्योती महाजन, बंडू काकडे, ॲड. शंकर कदम, प्रा. सुभाष सोनुने, सौ. उज्वला कदम आणि शेवटी अध्यक्षीय समारोप प्रबोधनासह काव्यगायनाने ॲड. कस्तुरे सह दोन दिव्यांग कवि इ. कवि कवयित्री यांनी मानवता, आपपरसमभाव, सर्वधर्म सहिष्णुता, माणसामाणसातील प्रेम, जिव्हाळा, सामाजिक सलोखा, कौटुंबिक सौख्य, ज्येष्ठांचे संगोपन, आई-वडिलांची माया, त्यांचे समर्पण, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण, सांस्कृतिक मूल्यांचे जतन, महापुरूष तथा संत अशा बौध्दिक, वैचारीक, शैक्षणिक परिवर्तन चळवळीतील महान व्यक्तिमत्त्वांचा तसेच मोठ्यांचा आदर मान, अंध श्रद्धा निर्मूलन, विद्यार्थ्यांमध्ये घडविणे आवश्यक असलेला उद्याचा भारत, साहित्यिक मूल्यांची त्यातल्या त्यात बालवयातूनच प्रतिभा प्रवर्तन जोपासना अशा विविधांगी काव्यरचना सादर करून या संमेलनास आभाळाच्या उंचीवर नेले. गुरूकुल चे संस्थापक अध्यक्ष तथा अर्जुन मुटकुळे सर तसेच त्यातील शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बाल विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे संमेलनातील काव्यवाचन ते आलेल्या पाहुण्यांचे निवास, चहा, नाश्ता, भोजन, मान सन्मान, विचारपूस, संमेलन स्थळ, विचारमंच, सभामंडप, ध्वनि संयोजन, स्वच्छता, बैठक व्यवस्थापन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांना लावलेला लळा, अभ्यास अध्ययनासोबतच प्रत्येक कामातील त्यांची तन्मयता आणि संमेलनाचे अध्यक्ष समारोप व सायंकाळच्या भोजनानंतर जेव्हा परत निघाले तेव्हा सारे विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना निरोप द्यायला गुरूकुलच्या मुख्य प्रवेशद्वारावर जमा झाले व पुन्हा यावे असा प्रेमाचा आग्रह केला. या सर्व बाबीं नजरेत भरण्यासाठी या ठरल्या. स्वागताध्यक्ष या नात्याने मा. अर्जुन मुटकुळे सरांनी सार्थ नियोजन घडविले.

       या सर्वांवर ताण किंवा एकूणच पूर्ण संमेलनाच्या यशस्वितेची सोनेरी किनार म्हणजे ज्येष्ठ हरहुन्नरी कवी आणि शब्द कवडसा साहित्य चळवळीच्या माध्यमातून सदैव तत्पर असलेलेॲड. शंकर कदम आणि कवयित्री सौ. उज्वला कदम यांचे चैतन्य शील व संयमी समयसूचक सूत्रसंचालन. अशा सदैव स्मरणात राहणाऱ्या या संमेलनाच्या यशस्वितेमधे राजे संभाजी गुरूकुल, परभणी मधील आबाल वृध्द सर्वांसह रसिक प्रेक्षकांचाही सिंहाचा वाटा असल्याचे निश्चित म्हणता येईल. गुरूकुल असे सामाजिक व शैक्षणिक प्रबोधनाचे कार्यक्रम सातत्याने घेत राहून महाराष्ट्रातील इतरही निवासी शैक्षणिक संस्थांना सुध्दा यासाठी प्रेरणा देत राहील ही अपेक्षा.

________________________

0/Post a Comment/Comments