लोकनेता न्युज नेटवर्क
सावखेड तेजन : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून सावखेड तेजन येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मंगल दिनानिमित्त समस्त समाज बांधव आणि समस्त गावकरी मंडळ, सावखेड तेजन यांच्या वतीने 'भिम विचारांचा प्रवाह' हा विशेष सांगीतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा सोहळा आज दि. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७:०० वाजता तक्षशिला बौद्ध विहार, सावखेड तेजन येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध भिमगायक संतोष मोरे हे असून, ते आपल्या संचासह महामानवाच्या जीवनकार्यावर आधारित भीमगीते आणि क्रांतिकारी विचार सादर करणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत आणि त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
'द वर्ल्ड बिगेस्ट भीम जयंती' या संकल्पनेखाली आयोजित या सोहळ्यात परिसरातील सर्व भीम अनुयायी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवास विनम्र अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील सामाजिक ऐक्य आणि वैचारिक जागृतीसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार असून, संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
________________________

Post a Comment