लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड | किरण पाटील वडजेकंधार तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसलगा येथे दि. १५ जून रोजी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. “नवीन स्वप्न, नवीन उमेद आणि नव्या सुरुवातीचा उत्सव” या भावनेने नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी व विद्यार्थ्यांच्या हितासाठी शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यात आली.विद्यार्थ्यांच्या आरोग्य व पोषणाचा विचार करून शाळेत देण्यात येणाऱ्या सकस शालेय पोषण आहाराचे महत्त्व सांगण्यात आले.शाळा प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साह, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेने झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, चांगल्या सुविधा आणि उज्ज्वल भविष्य मिळावे यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील आहे.शिक्षणाच्या या नव्या प्रवासात प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, हीच या प्रवेशोत्सवाची खरी भावना आहे.
________________________

Post a Comment