फसवी कर्जमाफीविरोधात कंधारमध्ये क्रांतीकारी शेतकरी संघटना आक्रमक; जीआर जाळून सरकारचा तीव्र निषेध

 


*लोकनेता न्युज नेटवर्क*

नांदेड | किरण पाटील वडजे 

फसवी कर्ज माफी व पिक विमा साठी क्रांतीकारी शेतकरी संघटना आक्रमक कर्ज माफीचा Gr जाळुन केला निषेध...आज उपविभागीय कार्यालय कंधार येथे क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने फसवी कर्ज माफी व कंधार लोहा तालुक्यातील पिक विमा व इतर मागण्या साठी उपविभागीय अधिकारी नरवडे साहेब व तहसीलदार गोरे साहेब यांना भेटून निवेदन देण्यात आले व कार्यालयासमोर फसव्या कर्ज माफीच्या G R ची होळी करून सरकारचा निषेध करण्यात आला .

यावेळी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे जिल्हा संघटक कैलास पाटील पवळे जिल्हा संघटक कल्याण कस्तुरे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष संदीप पाटील तोडंचीरे देवानंद पा मोरे संघटनेचे पवन पा सिरसाठ गंगाधर पा डावळे परमेश्वर पा कदम राम मोरे पाटील मारोती बाचेवाड यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...

0/Post a Comment/Comments