लोकनेता न्युज नेटवर्क
येवला :- सामाजिक प्रबोधनाच्या तथा साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातील गुणवंत तसेच समर्पित सेवेसाठी वाहून घेतलेल्या मान्यवरांच्या गुणगौरवासाठी संबंध महाराष्ट्रभर सुपरिचित असलेल्या, शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि. नाशिक च्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार प्रदान सोहळा तथा साहित्य आणि कवि संमेलन जून महिन्याच्या ०४ तारखेस आयोजित करण्यात येत असून याही वर्षी सदर कार्यक्रमाचे आयोजन दि. ०४-०६-२०२६ रोजी भव्य राजेशाही पांडूरंग लॉन्स, येवला येथे करण्यात येवून ज्येष्ठ साहित्यिक कलावंत तसेच बहुभाषिक लेखक, कवि गायक, कलावंत ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांना त्यांच्या सात दशकांच्या सामाजिक चळवळीतील समर्पित योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मा. नंदकुमार राऊत, अवर सचिव मंत्रालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली व मा. स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. प्रा. दादासाहेब कोते यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या या पुरस्कार व संमेलन सोहळ्यात मा. प्रभाकर सूर्यवंशी, धुळे , सुरेश पवार, नाशिक , प्रतिम पारखे, श्रीरामपूर, विजयराव भोरकडे, पिंपळगाव जलाल, डॉ. मंगल सांगळे, सिन्नर, सौ. सुवर्णलता गायकवाड चाबूक स्वार इ. ना सुध्दा पुरस्कृत करण्यात आले. सोबतच निमंत्रित मा. गझलकारां ची गझलस्पर्धा होवून दरवर्षीप्रमाणे साहित्यिक क्षेत्रातील लेखक, कवि, कथाकार, कादंबरीकार इ. चा सुध्दा सन्मान करण्यात आला.
________________________

Post a Comment