मातृतीर्थ सिंदखेडराजा :- येथे, पंढरपूर नगरी येथील प्रस्तावित आयोजना प्रित्यर्थ बहुजन साहित्य संमेलन २०२६ संदर्भात स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज दै . लोकनेता च्या कार्यालयात दि. १९-०६-२०२६ रोजी संपन्न झाली. ब. सा. संघाचे प्रसिध्दी अधिकारी संपादक रमेश खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली व दै. लोकनेता चे संपादक ज्ञानेश्वर बुधवत, पत्रकार राहूल झोटे, विजय भालमोडे, अंकुश पडघान, सामाजिक कार्यकर्ते सुरेश बुधवत तथा संघाचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे इ. मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत उपरोक्त संमेलनाच्या नियोजन निमित्ताने सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच साहित्यिक क्षेत्रातील लेखक, कवि, गायक,कलावंत तथा रसिक व नागरिक मंडळींनी या साहित्य पंढरीच्या संमेलन मेळ्यात तनमनधनाने सहभागी होऊन २०२५ च्या मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील सर्वार्थ संपन्न झालेल्या व एकप्रकारे ऐतिहासिक ठरलेल्या ब. सा. संमेलनाच्या बरोबरीने पंढरीची ही संमेलन वारी सुध्दा यशस्वी करावी असे भावनिक आवाहन करण्यात आले.
________________________

Post a Comment