लोकनेता न्युज नेटवर्क
पंढरपूर :- संतनगरी पंढरीच्या पावन स्थळी पद्मनाभ पॅलेस हॉल च्या सुंदर सभागृहात दि.२३-०८-२०२६ रोजी प्रस्तावित असलेल्या बहुचर्चित सातव्या बहुजन साहित्य संमेलनामधे प्रमुख अतिथी या नात्याने सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर येथील साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात आपल्या सेवाभावी कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माजी प्राचार्य एन्. बी. चापे यांना तसेच ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्रा. शिवाजी वाठोरे सर यांना निमंत्रित करण्यात आले असून संघाचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे, उपाध्यक्ष डॉ. बबनराव महामुने, सचिव डॉ. डी. व्ही. खरात तसेच पदाधिकारी भावकवी अंकुश पडघान यांनी दि. २५ जूलै, २०२६ रोजी प्रा. चापे सरांच्या निवासस्थानी उभय साहित्यिक मान्यवरांची भेट घेऊन त्यांना निमंत्रणाचे पत्र प्रदान केले. यावेळी ब. सा. संमेलनास शुभेच्छा देऊन प्रा. चापे सरांनी वरीलप्रमाणे उदगार काढले.
________________________
Post a Comment