लोकनेता न्युज नेटवर्क
बुलढाणा : अगदी हाकेच्या अंतरावर येवून ठेपलेल्या आणि बहुतांश साहित्यिक, कवि, लेखक, गायक, शाहीर, कलावंत आणि रसिक मान्यवरांची उत्सुकता शिगेला पोहोचविणाऱ्या बहुजन साहित्य संघ चिखली च्या, संतनगरी पंढरीच्या पद्मनाभ पॅलेस हॉल परीसरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरी मधे संपन्न होत असलेल्या सातव्या राज्यस्तरीय बहुजन साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदासाठी, आपल्या सडेतोड आणि मर्मभेदी काव्यप्रसृतिसाठी महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या विविध राज्यातील साहित्य व कवी संमेलनांमधून आणि विशेष म्हणजे महिला साहित्य व कवीसंमेलनांमधून सातत्याने चर्चेत असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा कवयित्री आशा खडतरे डांगे यांची सर्वानुमते निवड झाल्याची घोषणा, संघाच्या वतीने सर्व पदाधिकारी मंडळींनी बुलढाणा येथील बैठकीत दि. १९-०८-२०२६ रोजी जाहीर केली.
हजारो वर्षांच्या मानसिक, वैचारिक, शारीरिक व सामाजिक अवहेलनेवर जाहीररित्या चव्हाट्यावर मांडून पुरूषी वैषयिक व दानवी प्रवृत्तीला प्रतिभाशाली शब्दांच्या काटेरी आसूडाच्या फटक्यांनी आव्हान देत जाब विचारणाऱ्या आपल्या रचनांसाठी प्रसिद्ध असलेल्या तसेच नुकत्याच २७ मे रोजी १२ व्या रमाई गौरव साहित्य चळवळीच्या संमेलनामध्ये पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न सोहळ्यात रमाई गौरव पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या आणि दुसरे शिक्षक साहित्य संमेलन, छ. संभाजीनगर च्या अध्यक्षपद भूषविलेल्या आणि सोबतच साहित्य अकादमीच्या ' उन्मेष ' पटना, बिहार येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात व ' साहित्योत्सव ' दिल्ली सोहळ्यातील सन्मानित एवढेच नाही तर एम्. जी. एम्. विद्यापीठाच्या एम्. ए. मराठीच्या अभ्यासक्रमातील ' प्रिय, हा कण गॉड पार्टीकल आहे... ' या काव्यसंग्रहाच्या जनक तथा अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी कवयित्री आशा खडतरे डांगे यांचे या साहित्यिक भरारीस्तव सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.
________________________

Post a Comment