लोकनेता न्युज नेटवर्क
चिखली - येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा चिखली नगर पालिकेचे सदस्य असताना आठवडी बाजारातील वर्षानुवर्षे फुकटपुरा नांवाने ओळखल्या जाणाऱ्या, गोरगरीब, मजूर व आर्थिकच नव्हे तर सामाजिक दृष्ट्याही दुर्बल घटकातील नागरिकांचे अतिक्रमित आणि मिळेल तेथे जमेल तसे वास्तव्य असणाऱ्या झोपडपट्टीला नियमानुकूल घरकूल सदृश नव्या स्वरूपात उभे करणारे तत्कालीन शिल्पकार तसेच प्रत्येक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमात योगदान देणारेॲड. विजयकुमार कोठारी यांना, त्यांच्या सेवाभावी कार्याचा सन्मान म्हणून, आंतरराज्यीय ख्याती प्राप्त बहुजन साहित्य संघ, चिखली तर्फे दि. २३-०८-२०२६ रोजी आयोजित संतनगरी पंढरपूर येथील सातव्या बहुजन साहित्य संमेलन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून संघाच्या वतीने सादर निमंत्रित करण्यात आले असून तसे निमंत्रण पत्र त्यांना, ब. सा. संघाचे अध्यक्ष ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे व पदाधिकारी भावकवी अंकुश पडघान यांनी दि. ३१-०७-२०२६ रोजी सन्मानाने प्रदान केले.
सदर संमेलनात संविधान दिंडी, रांगोळी, ग्रंथ आणि चित्र काव्य प्रदर्शनी, परिसंवाद, कथाकथन, पुस्तक प्रकाशन, सांस्कृतिक कार्यक्रम, कविसंमेलन तसेच विविध क्षेत्रातील समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानाच्या " फुले - शाहू - आंबेडकर " पुरस्काराने गौरव, ठराव वाचन व समारोप अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असून यामध्ये सहभाग नोंदविण्यासाठी लेखक, कवि, कथाकार, साहित्यिक मंडळींनी संमेलन नियोजक रवि पुष्पा वसंत सोनार, पंढरपूर यांच्याशी ९९२२५१४३०० या मो. क्र. वर तसेच सचिव डॉ. डी. व्ही. खरात सर, बुलढाणा यांच्याशी मो. क्र. ७७४४८११९८२ वर संपर्क साधावा असे आवाहन नम्रपणे अध्यक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.
________________________

Post a Comment