पोएट्री फेस्टिवल २०२६-कोप्पल मधील निमंत्रितांच्या कवी संमेलनात अध्यक्ष म्हणून ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे निमंत्रित

 
लोकनेता न्युज नेटवर्क 
 
चिखली :- कर्नाटकातील कोप्पल येथे दि. ३ व ४ ऑक्टोबर, २०२६ रोजी हिंदी अनुसंधान प्रसार केंद्र, अ. नगर व गाविसिध्द एन्. बेल्लारी प्रतिष्ठान, कोप्पल आयोजित तसेच केंद्रीय राजभाषा अधिकारी डॉ. संजय बोरूडे, ख्यातनाम कन्नड साहित्यिक लेखक महेश बेल्लारी, सुप्रसिद्ध अनुवादक लेखिका रचना आणि ज्येष्ठ कवयित्री सुजाता भोजने संयोजित तधा महाराष्ट्राच्या ज्येष्ठ साहित्यिक मा. प्रतिमा इंगोले आणि मा. बसवेश्वर चेंघे, कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. आल्लमप्रभू बेत्तादूर यांच्या हस्ते उदघाटीत होणाऱ्या सोहळ्यातील दि. ३-१०-२०२६ च्या निमंत्रितांच्या कवी संमेलनात अध्यक्ष म्हणून हरहुन्नरी कलावंत साहित्यिक कवी तथा बहुजन साहित्य संघ चिखली चे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांना निमंत्रित करण्यात आले असून त्या निमित्ताने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
 सदर सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे डॉ. संजय बोरूडे, मा. महेश बेल्लारी, मोहन राठोड यांच्या सह डॉ. बबनराव महामुने 
छ. संभाजीनगर व डॉ. डी. व्ही. खरात तसेच देशातील बहुतांश प्रांतातील साहित्यिक, कवी, लेखक आणि कलावंत या साहित्य जत्रेमधे उपस्थित राहणार असून अनेक बहुचर्चित साहित्यिकांच्या ग्रंथ पुस्तकांच्या प्रकाशनासह साहित्यिक क्षेत्रातील विविध बाबींवर संशोधक चर्चा व गोष्टी तसेच बहारदार बहुभाषिक कवी संमेलन व इतर कार्यक्रमांची रेलचेल ही रसिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
________________________

0/Post a Comment/Comments