औसा/ जाफर पटेल :- महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत’ दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात उटी बुद्रुक ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधून प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावण्याचा मान उटी बुद्रुक ग्रामपंचायतीने मिळवला आहे. ही कामगिरी संपूर्ण औसा तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे.
राज्याचे मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री
जयकुमार गोरे, ग्रामविकास विभागाचे सचिव. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते उटी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी पुरस्कार स्वीकारला.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना (भा.प्र.से.), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बाळासाहेब वाघ, औसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद मिरगणे, सरपंच श्रीमती वैशाली कांबळे, ग्रामपंचायत अधिकारी महेश जगताप, ग्रामपंचायत सदस्य तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीने केलेले नियोजन, विकासकामांसाठी घेतलेली मेहनत, प्रशासनाचे सहकार्य आणि लोकसहभागातून साध्य झालेल्या कामगिरीची या पुरस्काराने दखल घेतली आहे. हा सन्मान म्हणजे उटी बुद्रुकच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक हाताच्या मेहनतीची पोचपावती आहे.________________________

Post a Comment