‘सरकारच्या तिजोरीत खडखडाट नाही, मग शेतकऱ्यांच्या वाट्याला पाच हजारांची भीक कशाला?’

रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या देऊळगाव राजात ‘भीक मागो’ आंदोलन; जमा झालेली रक्कम तहसीलदारांमार्फत सरकारला पाठवणार

लोकनेता न्यूज नेटवर्क

देऊळगाव राजा|प्रतिनिधी :- 
एकीकडे दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत आहे, तर दुसरीकडे शेतीचे उत्पन्न घटल्याने आणि आर्थिक संकट गडद झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना अग्रीम मदत म्हणून पाच हजार रुपये देण्याच्या घोषणेवरून क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘पाच हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा!’ अशी भूमिका घेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी देऊळगाव राजा येथे ‘भीक मागो’ आंदोलन करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून तहसील कार्यालयापर्यंत हे आंदोलन काढण्यात येणार असून, त्यातून जमा होणारी रक्कम तहसीलदारांमार्फत राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
       यंदाच्या दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. पिकांचे नुकसान, उत्पन्नातील घट, वाढता उत्पादन खर्च, कर्जफेडीचा ताण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह अशा अनेक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, मदत मिळविण्यासाठी विविध निकष, अटी आणि शर्तींची पूर्तता करावी लागत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे.
       शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस आर्थिक मदत देण्याची गरज असताना पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीची घोषणा करण्यात आल्याने संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतीचा खर्च, पिकांचे नुकसान आणि कुटुंबाच्या गरजा लक्षात घेता ही रक्कम पुरेशी नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
       शेतीसाठी बियाणे, खते, औषधे, मजुरी, मशागतीचा खर्च आणि इतर आवश्यक बाबींवर मोठा खर्च करावा लागतो. त्यातच दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पन्न राहत नाही. अशा परिस्थितीत जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या एकूण आर्थिक संकटाच्या तुलनेत अपुरी असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे.
   शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे, त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पुरेसा आधार मिळावा आणि दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची योग्य दखल घेतली जावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
   सरकारच्या मदतीच्या घोषणेचा निषेध नोंदविण्यासोबतच शेतकऱ्यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने ‘भीक मागो’ आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून आंदोलनाला सुरुवात होऊन तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.
         या आंदोलनादरम्यान जमा होणारी रक्कम तहसीलदार, देऊळगाव राजा यांच्यामार्फत महाराष्ट्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या रकमेवर उपरोधिक भाष्य करत, राज्यातील मंत्री आणि आमदारांची दिवाळी सुखा-समाधानात साजरी व्हावी, या भूमिकेतून ही रक्कम सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
       दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आयोजित या आंदोलनात देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते मधुकर शिंगणे, जुल्फिकार शेख आणि प्रदीप हिवाळे यांनी केले आहे.
        शेतकऱ्यांना तुटपुंज्या मदतीवर समाधान मानण्यास भाग पाडण्याऐवजी त्यांच्या नुकसानीचा गांभीर्याने विचार करून ठोस आर्थिक मदत द्यावी, दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात एकीकडे दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत आहे, तर दुसरीकडे शेतीचे उत्पन्न घटल्याने आणि आर्थिक संकट गडद झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना अग्रीम मदत म्हणून पाच हजार रुपये देण्याच्या घोषणेवरून क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘पाच हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा!’ अशी भूमिका घेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी देऊळगाव राजा येथे ‘भीक मागो’ आंदोलन करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून तहसील कार्यालयापर्यंत हे आंदोलन काढण्यात येणार असून, त्यातून जमा होणारी रक्कम तहसीलदारांमार्फत राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
        यंदाच्या दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. पिकांचे नुकसान, उत्पन्नातील घट, वाढता उत्पादन खर्च, कर्जफेडीचा ताण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह अशा अनेक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, मदत मिळविण्यासाठी विविध निकष, अटी आणि शर्तींची पूर्तता करावी लागत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे.
     शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस आर्थिक मदत देण्याची गरज असताना पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीची घोषणा करण्यात आल्याने संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतीचा खर्च, पिकांचे नुकसान आणि कुटुंबाच्या गरजा लक्षात घेता ही रक्कम पुरेशी नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
       शेतीसाठी बियाणे, खते, औषधे, मजुरी, मशागतीचा खर्च आणि इतर आवश्यक बाबींवर मोठा खर्च करावा लागतो. त्यातच दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पन्न राहत नाही. अशा परिस्थितीत जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या एकूण आर्थिक संकटाच्या तुलनेत अपुरी असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे.
       शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे, त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पुरेसा आधार मिळावा आणि दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची योग्य दखल घेतली जावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
      सरकारच्या मदतीच्या घोषणेचा निषेध नोंदविण्यासोबतच शेतकऱ्यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने ‘भीक मागो’ आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून आंदोलनाला सुरुवात होऊन तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.
        या आंदोलनादरम्यान जमा होणारी रक्कम तहसीलदार, देऊळगाव राजा यांच्यामार्फत महाराष्ट्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या रकमेवर उपरोधिक भाष्य करत, राज्यातील मंत्री आणि आमदारांची दिवाळी सुखा-समाधानात साजरी व्हावी, या भूमिकेतून ही रक्कम सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
       दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आयोजित या आंदोलनात देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते मधुकर शिंगणे, जुल्फिकार शेख आणि प्रदीप हिवाळे यांनी केले आहे.
        शेतकऱ्यांना तुटपुंज्या मदतीवर समाधान मानण्यास भाग पाडण्याऐवजी त्यांच्या नुकसानीचा गांभीर्याने विचार करून ठोस आर्थिक मदत द्यावी, दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांच्या सन्मानाचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
   दुष्काळाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित या आंदोलनाकडे तालुक्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
________________________

0/Post a Comment/Comments