लोकनेता न्यूज नेटवर्क
अनंत काळाच्या
अंधारल्या युगाला
स्वतः:चीच
लाज वाटण्याचा
अन्
कोट्यावधींच्या
हतबल
निष्पाप जीवांचे
हालहाल करून
खितपत पाडणाऱ्या
भयानक गुलामीच्या
शृंखलांना छेदून जाणाऱ्या
पहिल्या घणाघाताचा
आणि
हजारो वर्षांच्या
भयंकर अन्याय अत्याचारात
कायम पायदळी तुडविलेल्या
भयग्रस्त समाजाला
अवचित माणूसपण
बहाल करणारा
अनिर्बंध स्वैराचारी
अन् अमानवी
विचारांच्या
पाशवी मनोवृत्तीस
उध्वस्त करण्यासाठी
निरंतर खदखदणाऱ्या
अस्वस्थ ज्वालामुखीच्या
उद्रेकाचा
आणि सोबतच
या मानवमुक्तिसाठी
प्रस्थापित व्यवस्थेला
दंड ठोकून
निर्भिड आव्हान देणाऱ्या
एका महामानवाच्या
प्रथम हुंकाराचा
अत्त दीप भव
च्या साक्षीने
ज्ञान दीप उजळणारा
बुध्द सरणं गच्छामि
च्या पवित्र मंत्रोच्चाराने
भवतू सब्ब मंगलम्
चा विश्वकल्याणकारी
अमोघ संदेश देणारा
प्रज्ञा शील करूणा
चे वास्तव्य आणि
अस्तित्व दर्शविणाऱ्या
सम्यक शांत
बोधिसत्वाच्या सान्निध्याने
पावन ठरलेल्या
बोधीवृक्षाच्या सावलीला
घेवून येणारा
धम्म आणि संघासि
शरण जाण्याचा
समाज सेवेचा व
त्यासी एकनिष्ठेचा
सदैव एकसंघतेचा
माणसाला माणूस म्हणून
ओळख व
वागणूक देण्याचा
सर्वसमावेशक बंधूभावाचा
दया क्षमा शांती ची
शपथ देणारा
आणि आम्ही सर्वांनी
एका महात्म्याच्या हस्ते
ती घेतल्याचा
आमच्या उध्दाराचा
अज्ञानाच्या
अंध वाटेवरून
ज्ञानाच्या पथावर
पहिले पाऊल ठेवण्याचा
तो क्षण.....!
म्हणजेच.....
धम्मचक्र प्रवर्तन दिन.....!!
त्या निमित्ताने
सर्व नागरिकांना व
प्राणिमात्रांस
हार्दिक शुभेच्छा.....
भवतू सब्ब मंगलम्.....!!!
९५५२०९४०४९,
९८५०२७५१०४.....
दि. २०-१०-२०२६,
मंगळवार..... ________________________


Post a Comment