सेनगाव तालुक्यातील आडोळ येथील घटना,( तीन मुली एक मुलगा)
लोकनेता न्यूज नेटवर्क
सेनगाव ( महादेव हरण) :- सेनगाव तालुक्यातील आडोळ येथे दि 12 ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास अल्पभूधारक शेतकरी समाधान पांडू जी खिल्लारे यांनी आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे,
यावर्षी दुष्काळ जनक परिस्थिती निर्माण झाली असून सावकाराचे पैसे ,बँकेचे हप्ते,कृषी केंद्राची बाकी, याचा ध्यास मनामध्ये घेऊन आढळ येथील अल्पभूधारक शेतकरी समाधान खिल्लारे यांच्याजवळ ६० गुंठे जमीन असून आपला उदाहनिर्वाह शेतीवर अवलंबून असून रोज शेतामध्ये मेहनत करून घरच संसार चालवत होते परंतु यावर्षी निसर्गाने पाठ फिरवल्याने अनेक शेतकऱ्यावर संकट ओढावले यातच आडोळ येथील अल्पभूधारक शेतकरी समाधान खिल्लारे यांनी सकाळच्या सुमारास आपल्या शेतामध्ये लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे सावकाराचे पैसे बँकेचे हप्ते कृषी केंद्राची बाकी कशाने फेडावी याचा ध्यास मनामध्ये सतत येत असल्याने, खिल्लारे यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे त्यांना तीन मुली एक मुलगा , पत्नीसह छोटा परिवार असून त्यांच्या जाण्याने आडोळ गावावर मोठी शोककळा पसरली घटनास्थळी सेनगाव पोलिसांनी पाहणी करून मृतदेह सोविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सेनगाव येथे नेण्यात आला पुढील तपास सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे, ________________________

Post a Comment