बुलढाणा :- श्री. संत चोखामेळा अध्यासन केंद्र, आळंदी, पुणे, वृन्दावन फाऊंडेशन, पुणे तथा श्री. संत नामदेव महाराज संस्थान, नरसी नामदेव तर्फे दि. २४ व २५ ऑक्टोबर, २०२६ रोजी नरसी नामदेव येथे सुप्रसिद्ध संत साहित्यिक प्रा. विठ्ठल जायभाये यांच्या अध्यक्षतेखाली मा. इंद्रजीत काका देशमुख व इतर अनेक मान्यवर साहित्यिक मंडळींच्या उपस्थितीत मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते उदघाटीत होवून संपन्न झालेल्या तिसऱ्या संत चोखामेळा द्विदिवसीय साहित्य संमेलनात बहुजन साहित्य संघाचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक कथाकार डॉ. बबनराव महामुने यांनी मोगलाईच्या खेडवळ बोलीभाषेतील मनोवेधक व प्रबोधनपर कथा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्या निमित्ताने निमंत्रित कथाकार या नात्याने मान्यवरांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संत चोखामेळा अभ्यासक ज्येष्ठ कवी लक्ष्मणराव हेंबाडे, मंगळवेढा, ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड, शिरूर कासार, मा. भास्कर बढे, बहुजन साहित्य संघाचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे इ. बरीच मंडळी उपस्थित होती.________________________

Post a Comment