प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित अपप्रचार रोखावा

दोषींवर कायदेशीर कारवाई करा!; लातूरमध्ये विविध संघटना आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


लोकनेता न्यूज नेटवर्क 

लातूर /जाफर पटेल :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांच्याविरोधात काही व्यक्ती व संघटनांकडून कथित आक्षेपार्ह विधाने करून समाजमाध्यमांवर बदनामी केली जात असल्याचा आरोप लातूर शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींनी केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यापर्यंत पोहोचवून शासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे.


प्यारे खान यांनी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अल्पसंख्याक समाजातील शैक्षणिक संस्थांच्या समस्या, शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध करुन देणे यांसारख्या विषयांकडे लक्ष दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जैन, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, मुस्लिम यांसह विविध अल्पसंख्याक घटकांच्या प्रश्नांबर काम करताना सामाजिक सलोखा, शांतता आणि परस्पर विश्वास टिकवणे महत्त्वाचे असल्याची भूमिकाही निवेदनकर्त्यांनी मांडली.


राज्यातील विविध कारागृहांना भेटी देऊन शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही किया आर्थिक अडचणींमुळे जामिनासाठी आवश्यक आर्थिक व्यवस्था करू न शकल्याने अडचणीत असलेल्या कैद्यांना कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी प्यारे जिया खान प्रयत्न करत असल्याचे निवेदनकर्त्यांनी सांगितले.


याच उपक्रमांतर्गत त्यांनी नाशिक कारागृहाला भेट दिली होती. या भेटीदरम्यान बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेम याच्याशी त्यांची भेट झाल्याचा मुद्दा उपस्थित करून नागपूरमधील काही हिंदुत्ववादी संघटनांकडून त्यांच्यावर टीका केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेचा आधार घेऊन खान यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही प्रतिनिधींनी केला. कारागृहातील कैद्यांना कायदेशीर मदत मिळवून देणे आणि आर्थिक अडचणींमुळे जामीन मिळवता न येणाऱ्या व्यक्तीच्या प्रकरणांत कायदेशीर मागनि मदत करणे, हे सामाजिक कार्याच्या दृष्टीने पाहिले पाहिजे, अशी भूमिका निवेदनकर्त्यांनी मांडली. मात्र, या उपक्रमाचा चुकीचा अर्थ लावून बदनामीकारक विधाने केली जात असल्यास त्याची बौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.


या प्रकरणात आरोपांची निष्पक्ष चौकशी करून बस्तुस्थिती समोर आणणे आणि कायद्याच्या चौकटीत योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक असल्याची भूमिका प्रतिनिधींनी व्यक्त केली.


या निबेदनप्रसंगी सालार शेख, सामाजिक कार्यकर्ते अॅड. ला. रा. शेख, इरफान आर. शेख (महाराष्ट्र जनएकता संघटना), मुजफ्फर कुरेशी, शेख मोहसीन (अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश), असिफ आर. पटेल, हमीद शेख, अमोल इंगळे, इलियास चौधरी, रफिक गुलाम कुरेशी, वसीम एस, मनियार, शैफुला शेख, डॉ. ताहेर शेख, अजरोदिन सय्यद, मोमीन हारून, खय्युम शेख, गोविंद सोदले, मस्के नेताजी, अब्दुल शेख यांच्यासह लातूर शहरातील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


चौकट कलर डब्बा करा....निराधार आरोपांची चौकशी करून कारवाई करावी


एखाद्या सार्वजनिक पदावरील व्यक्तीच्या कार्यपद्धतीबाबत किंवा निर्णयांबाबत आक्षेप असल्यास ते योग्य पुराव्यांसह सक्षम प्राधिकरणासमोर मांडता येतात. मात्र, कथित खोटी माहिती पसरवून व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे आणि समाजात गैरसमज निर्माण करणे योग्य नसल्याचे निवेदनकर्त्यांनी स्पष्ट केले. संबंधित व्यक्ती व संघटनांकडून करण्यात आलेल्या विधानांची सत्यता तपासावी, समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आलेल्या कथित बदनामीकारक मजकुराची चौकशी करावी आणि कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. तसेच समाजात तेढ निर्माण होणार नाही आणि सामाजिक सलोखा कायम राहील, यासाठी प्रशासनाने आवश्यक पावले उचलावीत, असेही निवेदनकत्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात आरोपांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणणे आणि कायद्याच्या चौकटीत योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक असल्याची भूमिका प्रतिनिधींनी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments