डॉ. तृप्ती काटेकर
निसर्गोपचार गौरव सन्मानाने पुरस्कृत
बुलढाणा :- महाराष्ट्रभर आपल्या निसर्गोपचार व योग चिकित्सेद्वारे गोरगरीब व नागरिकांना उपचाराचा दिलासा देवून गेली अनेक वर्षे जनमानसात आपली आगळीवेगळी जनहित समर्पित प्रतिमा साकारणाऱ्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याच्या लेकीचा अर्थात डॉ. तृप्ती विलासराव काटेकर-महाले यांचा, त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेवून आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए. जी. एम्. ए. तथा योगा निसर्गोपचार चिकित्सक असोसिएशन तर्फे त्यांना निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६ हा बहुमानाचा पुरस्कार प्रदान करून त्यांना दि. ०४-१०-२०२६ रोजी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. बुलढाणा येथील भ्रातृमंडळ हॉल येथे संपन्न झालेल्या या सोहळ्याला बुलढाण्याचे धडाडीचे आमदार मा. संजय गायकवाड, बुलढण्याच्या नगराध्यक्षा सौ. पूजाताई गायकवाड, डॉ. सचिन सुपे, डॉ. त्रिदीप गुहा, डॉ. प्रशांत कपाले, एम्. जी. एम्. विद्यापीठाचे योगा विभाग प्रमुख डॉ. गंगाप्रसाद खरात, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन चे व्हॉईस चेअरमन नितिनराजे पाटील , राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, सौ. दिशा चव्हाण, विनोद ढोबळे, विजय नवल पाटील, रावसाहेब घोडेगाव, रामेश्वर शिंदे, श्रीकांत अंजुटगी, भानुदास परबत, अशोक देवकर, संजय गवारे, सौ.स्मिता खारकर, राहूल देशमुख, आशिष सूर्यवंशी तथा आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे इतर पदाधिकारी आणि नागरिक प्रेक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्कार डॉ. तृप्ती काटेकर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यामुळे सुप्रसिद्ध आधार संघटना, चिखली, केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली, बहुजन साहित्य संघ, पंचशील भजनी मंडळ इ. च्या वतीने तथा समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येवून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
________________________

Post a Comment