रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन; अधिकाऱ्यांचे पुतळे फरफटत निषेध




लोकनेता न्यूज नेटवर्क 
 वाघोली  संतोष कदम :- भावडी रोडवरील खड्ड्यांविरोधात सामाजिक कार्यकर्ते सुभाष जाधवर यांनी अधिकाऱ्यांचे पुतळे बनवून फरफटत नेत अनोखे आंदोलन केले.
     वाघोली परिसर आणि भावडी रोड चार नंबर येथे मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक, शालेय विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग प्रचंड त्रस्त झाला आहे. वारंवार तक्रार करूनही पुणे महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने सामाजिक कार्यकर्ते सुभाष जाधवर , हिरामण वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
    सुभाष जाधवर यांनी महापालिका अधिकाऱ्यांचे दोन पुतळे तयार करून ते कावडीप्रमाणे खांद्यावर उचलून, रस्त्यातील खड्ड्यातून ओढत-फरफटत नेले. या आंदोलनात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
     या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले असून काहींना जीव गमवावा लागला आहे. धुळीमुळे विद्यार्थ्यांचे गणवेश खराब होत असून नागरिकांना त्वचा आणि श्वसनाच्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

मी स्वतः फोनद्वारे, मेसेजद्वारे फोटो पाठवून, लेखी निवेदन देऊनही प्रशासनाने खड्डे बुजवले नाहीत, म्हणून हे आंदोलन करावे लागले. महानगरपालिकेने योग्य ती कार्यवाही केली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.
- सुभाष जाधवर, सामाजिक कार्यकर्ता, वाघोली
________________________
🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.lokneta.in

0/Post a Comment/Comments