मत्स्योदरी विधी महाविद्यालयाच्या पठाण तहूर खानला 'सेंट्रल झोन' तायक्वांदो स्पर्धेत कांस्यपदक!

AI-जनरेटेड इमेज:
लोकनेता न्युज नेटवर्क

जालना :- दि.३१ ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत श्री बंकटस्वामी महाविद्यालय, बीड येथे आयोजित आंतर-महाविद्यालयीन 'सेंट्रल झोन' तायक्वांदो या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेत मत्स्योदरी विधी महाविद्यालय, जालना येथील बी.ए.एल.एल.बी अंतिम वर्षाचा विद्यार्थी पठाण तहूर खान इलियास खान याने ६८ ते ७४ किलो (पुरुष) वजनी गटात नेत्रदीपक खेळ प्रदर्शन करत कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
    महाविद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्दल प्राचार्या डॉ.तरन्नुम शेख , प्रा.गोरे एस.जे., प्रा.पवार आर.पी., प्रा.हंगरगे एस.डी.क्रीडा मार्गदर्शक प्रा.पटेकर एस. यू, प्रा.जोशी व्हि.एस., प्रा.शेख एच.एम.,कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी पठाण तहूर खान याचे विशेष अभिनंदन करत त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरातून खेळाडूवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
________________________

0/Post a Comment/Comments